पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे.अशीच भयंकर घटना उघडकीस आली आहे. तरुणीला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये समोर आला आहे.

भाच्याने मामाच्या मुली बरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरुन भाच्याच्या दोन बहिणींना नग्न करून मारहाण करण्यात आली. मामाच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मारहाणीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. पुढे तरुणाने तिच्यासोबत लग्न केले. याच रागातून या मामाने भाच्याच्या दोन्ही बहिनींना मारहाण केली. धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे. एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *