पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शेरे(ता.मुळशी)गावातील गोरगरीब जनतेसाठी हक्काचा निवारा मिळावा यासाठी घरकुलाच्या कामांना गती देणार असल्याची महिती शेरे गावच्या ग्रामपंचायत सदस्या सविता ढमाले यांनी सांगितले त्या हवेलीनामाच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेरे हे छोटेखानी गाव भौगोलिक दृष्ट्या डोगराळ भागावर वसलेले असून येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय भात शेती आहे, गावातील बरेचसे नागरिक कुटुंबाच्या उपजीवीकेसाठी पुणे शहराकडे धाव घेत असून गावात कुटुंबातील इतर सदस्य शेतीवर आपली गुजराण करत आहेत. गावातील गोरगरीब जनेतेला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या घरकुलाचे ठराव करुन पुणे जिल्हा परिषद तसेच मुळशी पंचायत समितीला पाठवून यातून जास्तीत जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार,त्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे शेरे ग्रामपंचायतीच्या सदस्या ढमाले यांनी सांगितले. भाविष्यात जिल्हा परिषदेच्या फंडातून गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमीचे सुशोभिकरणाच्या कामाला प्राधान्य देणार असून गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तसेच गावात विकासाची गंगा आणण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन विकासकामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावणार असून भविष्यात शेरेगावच्या विकासाला प्राधान्य देऊन सर्वांगिण विकास साधणार असल्याचे स्पष्ट केले.
