वर्धा [साहित्य नगरी हवेलीनामा वृत्तसमुह] वर्धा नगरीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी देशात आणीबाणी सदृश्य स्थिती असल्याचा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही पुन्हा पुन्हा इकडे येत चला’ अशी कोपरखळी मारली तर शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी देखील मुद्द्याला धरून म्हणाले की, महाराष्ट्रात आणीबाणी नाही तर संस्कृती नांदते अशी पुष्टी जोडली संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सरकारकडून मदत घेताना काही पथ्य पाळा अशा शब्दात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला चुकीच्या गोष्टीवर महाराष्ट्रात आवाज उठतो असा गर्भित इशारा देखील कुमार विश्वास यांनी दिला अशी टोमणेबाजी आणि चिमटे काढण्याची जुगलबंदी संमेलनाच्या उद्घाटन पर भाषणात रंगली.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल पार पडले यावेळी संमेलना अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर आणि मावळते अध्यक्ष भरत सासर ,मंत्री दीपक केसरकर, कुमार विश्वास, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, गिरीश गांधी, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, डॉ. पी डी पाटील, संमेलन कार्याध्यक्ष दीपक दाते आदी उपस्थित होते. जेव्हा दिल्लीला अहंकार चढतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने तो मोडून काढला जातो या वाक्याने कुमार विश्वास यांनी भाषणाची सुरुवात केली, देशात आणीबाणी सदृश्य स्थिती असल्याचाही उल्लेख केला यावर केसरकर यांनी ‘राज्यात कधीच आणीबाणी येणार नसल्याचा खुलासा केला त्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी हे जनतेचे सरकार आहे येथे आणीबाणीला अजिबात स्थान नाही संमेलन हे साहित्यिकांचे आहे म्हणून सरकारने संमेलनात कसलाच हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टीकरण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *