थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) भाद्रपद शुद्ध द्वितीया यादिवशी थेऊर येथील द्वारयात्रा दक्षिण दिशेस असलेल्या आसराई मातेच्या दर्शनासाठी पोहोचते आज थेऊर ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गावातून सुरुवात केली. याअगोदर पहिले द्वार पूर्वेस ओझराई मातेच्या दर्शनाने प्रतिपदेस सुरुवात झाली.
अष्टविनायकापैकी बहुतेक ठिकाणी द्वारयात्रेची प्रथा आहे त्यात मोरगाव रांजणगाव ओझर सिद्धटेक आदी ठिकाणी वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे ही यात्रा पार पडते.
थेऊर येथिल आजचा दुसरा दिवस भक्तांमध्ये यात्रेबद्दल उत्साह भरपूर होता साधारणपणे हे अंतर १६ कि मी चे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भाविक म्हातोबा आळंदी येथे पोहोचले तेथील श्री आसराई मातेचे दर्शन घेतले त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा थेऊरच्या दिशेने परत निघाले.

