औरंगाबाद [हवेलीनामा वृत्तसमुह] औरंगाबाद-पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. एस.टी आणि बैलगाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागेवरच ठार झाले आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढोरेगावर परिसरात हा अपघात घडलाय. ही बैलगाडी ऊसतोड करणाऱ्या मजुराची होती. या घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे

नाशिक जिल्ह्यातील गिरे परिवार औरंगाबाद मध्ये ऊसतोडीसाठी आले होते.नेहमीप्रमाणे सकाळी ते बैलगाडीने ऊसतोडी करण्यासाठी शेतावर जात होते.ते इसारवाडी फाट्याजवळ असलेल्या लोखंडी पुलावर आले असता एस.टी.ने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बैलगाडीतील चौघेजण दूरवर फेकले गेले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच अपघाताची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी धावले आणि सर्व जखमींना रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कालीयाबाई आणि अर्जुन गिरे या दोघांना मृत घोषित केले. तर इतर दोघांवर उपचार सुरु केले.या भीषण अपघातात बैलगाडीला जुंपलेला एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी आहे.तर बैलगाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर दोन दिवसातील हा दुसरा अपघात झाला आहे, नेहमी या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अपघातात कुणाची चूक होती हे स्पष्ट झाले नसून या अपघात प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *