औरंगाबाद [हवेलीनामा वृत्तसमुह] औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत तब्बल २ हजार ४८५ मते बाद झाली यात उमेदवारांशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी अशा प्रकारची `शाळा` शिक्षकांकडून केली जाते. पहिल्या पसंतीची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर बाद मते जाहीर करण्यात आली. अनेक शिक्षकांनी मतदान करण्याऐवजी मतपत्रिकांवर शेरे लिहल्याचे समोर आले आहे.
अनेक मतदारांनी मत पत्रिकेवर पसंती क्रमांकाऐवजी मतपत्रिकांवर मजकुर होता ‘एकच मिशन जुनी पेन्शन, नो पेन्शन नो वोट, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, विना अनुदानित शाळांना अनुदान द्या, प्रचलित नियमानुसार अनुदान द्या’ अशा मागण्या चक्क मतपत्रिकेवर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा मतपत्रिका बाद करण्यात आल्या.
