हिंगोली [हवेलीनामा वृत्तसमुह] हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जैन मंदिराच्या बाजूला खोदकाम चालू असताना जैन संप्रदायातील 24 तीर्थंकर यांपैकी एक असलेले तीर्थंकर भगवान कुंथूनाथ यांची पुरातन मूर्ती सापडली असून ती सुमारे तेराशे वर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

जैन समाजामध्ये दिगंबर पंथीय 24 तीर्थंकरांपैकी एक असलेले भगवान कुंथूनाथ यांची साधारण पाच फूट उंचीची मूर्ती औंढा नागनाथ येथील जैन मंदिरात होत काम करत असताना सापडली ही मूर्ती तेराशे वर्ष पुरातन असल्याचा अंदाज असून या मूर्ती संदर्भात पुढील निर्णय जैन मुनींच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल असे तेजकुमार झांजरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *