पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे इयत्ता सहावी आणि सातवी चे जिल्हा परिषदेच्या शाळेत विना परवाना गेल्या दोन वर्षापासून चालू असलेले वर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी बंद करण्याचे आदेश दिले आहेत तसेच यापुढे हे वर्ग सुरू राहिल्यास यासाठी शिरूरचे गटविकास अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यास जबाबदार असतील असेही या देशात म्हटले आहे
शिरूर चे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दोन वर्षापासून शासनाची परवानगी नसताना देखील इयत्ता सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हा प्रकार पत्रकारांच्या निदर्शनास आला जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या बाजूला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती विद्यालय आहे त्या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू आहेत असे असताना देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी आणि सातवीचे वर्ग भरविण्यात येत असत या दोन्ही वर्गात 30 मुले शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेच्या संगणक प्रणालीमध्ये कोठेही नोंद असल्याची आढळून येत नाही यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार यांच्यासह काही स्थानिक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या नजरेस आणून दिला एवढेच नाही तर शाळेत शिक्षक उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गावात इतर संस्थेची शाळा उपलब्ध असताना विनापरवाना वर्ग सुरू ठेवण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यानंतर या शाळेची पाहणी केल्यानंतर विनापरवाना सहावी व सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर आल्यानंतर हे वर्ग बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या
