पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] कल्याणीनगर भागात पहाटच्यावेळी पादचारी तरुणांना धमकावून लुटणाऱ्या टोळीस येरवडा पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोनू सुमित डिंगीया, अभिषेक बादशहा गोहर, अमित रमेश सारसार व विकास राजेश खरे अशी अटक करण्यात तरुणांची नावे आहेत. त्याच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही कारवाई पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, कैलास डुकरे, किरण घुटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी कल्याणीनगर येथे पहाटे साडे चारच्या सुमारास दोघेजण गप्पा मारत थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी या दोघांना धमकावत लुटले. त्यांचा एक मोबाईल घेऊन चौघे पसार झाले होते. येरवडा पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत होते.
यातील संशयित हे बोपखेल भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, कैलास डुकरे, किरण घुटे व त्यांच्या पथकाने सापळा रचून या चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडे सखोल तपास सुरू असून, त्यांनी यापुर्वी काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास केला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
