पुणे [ हवेलीनामा वृत्तसमुह] आज पहाटे पुणे सोलापूर महामार्गावर यवतजवळ घडलेल्या अपघातात पुणे शहर पोलिसात कर्तव्यावर असलेले नितीन शिदे हे पोलीस नाईक या पदावर काम करत होते.एक उमदा सहकारी गेल्याने सर्व मित्र परिवारात दुःखाचे सावट पसरले आहे.

आज पोलीस नाईक शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना काळाने गाठले. या अपघातात मरण पावलेले नितीन दिलीप शिंदे हे पोलीस नाईक या पदावर भरोसा सेल गुन्हे शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते. ॲथलेटिक्स प्रकारात ते उत्कृष्ट धावपटू होते. पुणे शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना विविध गुन्ह्यात त्यांचा आरोपी पकडण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता.

नितीन शिंदे यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक उमदा व चांगला सहकारी गेल्याची भावना पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली संस्कृती (वय 13 ) व गिरीजा (वय ११) असा परिवार आहे. नितीन शिंदे यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *