थेऊर (प्रतिनिधी हवेलीनामा ऑनलाइन) आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सभागृहात त्यांच्या प्रतिमेचे पुजन पांडुरंग गावडे यांनी करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे,सतोष काकडे,संजय काकडे,शिवसेना शाखाप्रमुख नवनाथ कुंजीर,श्रीनिवास कुंजीर, चिंतामणी सहा सिटर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर वैराट,संजय गावडे,भाऊसाहेब गावडे,कैलास खोमणे, संतोष बोडरे,बाबा चव्हाण,मंगेश गावडे, अजय शितकल,सुरेश गावडे,दिपक चव्हाण तसेच थेऊर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थिती होते.

तसेच थेऊरमधील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक समाज मंदिरात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन समाजबांधवांकडून अभिवादन करण्यात, दुपारी बारा वाजता त्यांना समाजाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी राजे उमाजीनाईक यांच्या नावाच्या घोषणा देऊन जयघोष करण्यात आला रामोशी समाज व ग्रामस्थ उपस्थित होते.

थेऊर येथील केजी फाउंडेशनच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अगोदर केजी फाउंडेशनच्या हाॕल मध्ये राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे,केजी फाउंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन पुजन केले त्यानंतर यशवंत सहकारी साखर कारखाना वसाहतीत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली यावेळी पोलीस नाईक विजय जाधव, दलित महा संघाचे जिल्हा अध्यक्ष आंनद वैराट,देविदास गावडे,राहूल गायकवाड,मिलिंद गुरव,आत्माराम खेंडेकर,दत्ताञय गावडे,सचिन राऊत उपस्थित होते याप्रसंगी महापुरुषाच्या जंयती साजरी करताना सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करणार असल्याचे केजी फाउंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे यांनी सांगितले

