मुंबई  (हवेलीनामा वृत्तसमूह) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात कार आणि लक्झरी बसमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला या अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा जागेवर चक्काचूर झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारची लग्झरी बसला धडक बसली. गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लक्झरी बसवर कार धडकली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *