थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] तिर्थक्षेत्र थेऊरगावाकडे येणारामार्गावर एक मोठा कंटेनर रस्त्यावरून खाली घसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली कर्तव्य तत्पर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार उमेश ढाकणे तसेच कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे व सहकाऱ्यांनी तो कंटेनर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू केले.
थेऊरफाटा लोणीकंद या मार्गावरील थेऊर – थेऊरफाटा या रस्त्याचे नुकतेच काम पुर्ण झाले रस्त्याची रुंदी ही कमी असल्याने वाहनांची गती यामुळे अपघाताची शक्यता वाढली त्यात साईडपट्टीवर मुरुम टाकण्यात आला पण तो अपघातास कारणीभूत ठरत आहे त्यावर वाहने घसरत असल्यानेच आज मोठा कंटेनर रस्ता सोडून शेतात गेला कंटेनरची रुंदी अधीक असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार उमेश ढाकणे आणि कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे मित्र मंडळीसह घटनास्थळी पोहोचले व तो बाजुला घेण्यासाठी प्रयत्न चालू केले.
