गोहाटी [हवेलीनामा वृत्तसमुह] येत्या काही महिन्यांत आसाम मधील हजारो पतींना अटक होणार कारण पाॅस्को कायद्यानुसार 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे मग संबंध ठेवणारा मुलीच्या कायदेशीर पती असला तरीही त्याच्यावर कारवाई होणार असे आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा एका सरकारी कार्यक्रमात म्हणाले.
मुलीच्या विवाहाचे कायदेशीर वय 18 वर्षे असून कमी वयाच्या मुलीशी लग्न करण्यावरही कारवाई केली जाईल अनेकांना जन्म ठेवीची शिक्षा होऊ शकते असे ते म्हणाले अल्पवयीन मातृत्वाला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली बालविवाह आणि अल्पवयीन मातृत्वाला आळा घालण्यासाठी आपल्या सरकारच्या बांधिलकीचा ही त्यांनी यावेळी पुनरुचार केला.
