पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] दौंड तालुक्यातील रावणगांव परिसरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका तीन महिन्याच्या तान्ह्या बाळाला महामार्गालगत रस्त्याच्या आणि सर्व्हिस रस्त्याच्या दरम्यान असलेल्या चारीत टाकून दिल्याची घटना उघड झाली आहे यावर अज्ञात पालक आणि आई-वडिलांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावणगांवातील ईश्वर रांधवण यांच्या शेताजवळ पुणे सोलापूर महामार्ग आणि महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मधील चारीत एका तीन महिन्याच्या बाळाला कडाक्याच्या थंडीत टाकून तिचे आईवडील पसार झाले ही घटना शुक्रवारी निदर्शनास आली. चारीत एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने शेजारील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तीन महिन्याची मुलगी अंगावर लाल रंगाचा स्वेटर आणि गुलाबी शालीत गुंडाळुन ठेवलेली होती. या शेतकऱ्यांनी या बाळाच्या नातेवाईकांचा आजुबाजुच्या परीसरामध्ये बराच शोध घेतला पण शोध लागला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रकार दौंड पोलीसांना फोनवर कळवला. शेतकरी पद्माकर कांबळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. दरम्यान,या बाळाच्या नातेवाईकांचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.

महामार्ग आणि सेवा रस्त्याच्यामध्ये एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज येत होता. शेतकरी पद्माकर कांबळे, ईश्वर रांधवन अनिकेत रांधवन, युवराज रांधवन यांनी बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना तिथे तीन महिन्याची मुलगी गुलाबी शालीत गुंडाळुन ठेवलेली दिसली. थंडी असल्याने ती जोरात रडत होती. या शेतकऱ्यांनी या बाळाच्या नातेवाईकांचा आजूबाजुच्या परीसरामध्ये शोध घेतला. परंतु मुलीने नातेवाईक सापडले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी अज्ञात पालकांवर मुलीला उघड्यावर सोडून देत परीत्याग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *