नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचा देशातील युवकांना लाभ होत आहे आताचा काळ हा भारताचा असल्याने हा देशातील तरुणांसाठी नव्या संधींचा कालखंड असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं नवी दिल्लीतल्या करी आप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्रसेनेच्या वार्षिक मेळाव्यामध्ये ते छात्रांना संबोधित करत होते युवाशक्ती हा भारताच्या विकासाच्या प्रवासाला चालना देणारा मुख्य घटक आहे युवकांसाठी आज भारतात अनेक नवीन क्षेत्र खुली होत आहेत या साऱ्याचा तरुणांना फायदा होत असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एनसीसीच्या स्थापनेलाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्याबद्दल त्यांनी संपूर्ण सर्वांचे अभिनंदन केलं यानिमित्त काढण्यात आलेल्या 75 रुपयांच्या खास नाण्याचही अनावरण यावेळी पंतप्रधानांनी केलं तसंच एनसीसीच्या मशाल फेरीलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
