पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हिंदू धर्मात अनेक पंथ असून त्यापैकी वैष्णव, शैव या प्रमुख पंथाबरोबरच गाणपत्य या पंथाचे सुद्धा अनुयायी आहेत महाराष्ट्रात गणपती देवतांची भक्ती करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे राज्यात गणपतीची अनेक अधिष्ठान आहेत त्यापैकी अष्टविनायकाचे विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी आख्यायिका आहेत.यातील पाच तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात आहेत.

पुणे शहरालगत असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीचे महात्म्य भक्तांमध्ये अधिक परिचित आहे.भाद्रपद शुध्द प्रतिपदा यादिवशी पहिले पूर्व द्वार कोरेगाव मूळ येथील श्री ओझराई माता मंदिर येथे असते तेथे भक्त पूजा आरती झाली की नैवैद्य फराळ करून भक्त मंडळी मोरया चे भजन करत पुन्हा श्री चिंतामणी मंदिराकडे निघतात.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही द्वारयात्रा मंदिरात परतते.
