नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर करू नका कॉपी करू नका अशा मार्गाचा वापर केल्याने तो जीवनात उपयोगी पडणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले

“परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमात त्यांनी तालकटोरा मैदानात आयोजित सहाव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची संवाद साधला, फसवणूक, लक्ष गाठण्यासाठी चुकीचा मार्ग निवडणे हे जीवनात उपयोगी पडणार नाही असे सांगताना मोदी म्हणाले, परीक्षेचा ताण घेऊ नका त्या ऐवजी आपले लक्ष अधिक अभ्यासावर केंद्रित करा, मोबाईल सारख्या आधुनिक उपकरणांच्या आहारी न जाता त्याच्याप्रमाणे स्वतः अधिक स्मार्ट होण्यासाठी प्रयत्न करा मोबाईल हे संवादाचे साधन आहे ते साधण्यासाठी आणि समाज माध्यमावर आपले मत व्यक्त करण्यापुरताच त्याचा वापर करावा परीक्षेचा निकाल हा अंतिम नसतो हे लक्षात ठेवा तसेच त्यामुळे आपले आयुष्य संपणारे नाही तुमच्याकडे आलेला चेंडू तुम्हाला खेळायचा आहे मग चौकार किंवा षटकार ठोकला जाणार याकडे दुर्लक्ष करा. पालकांनी दुसऱ्या मुलाशी आपल्या पाल्याची तुलना करू नये त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढतो मुलांना दहावी बारावीनंतर पर्यटनासाठी पैसे पालकांनी उपलब्ध करून द्यावे, त्यावर लेखन करण्यास सांगावे समाजातील नागरिकाशी सुसंवाद साधण्यास सांगावे त्यामुळे त्यांचे क्षितिज विस्तारण्यास मदत होईल.

कुटुंबीयांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा बाळगणं स्वाभाविक आहे मात्र मुलांच्या परीक्षा आणि संबंधित निकाल हे सामाजिक प्रतिष्ठाचा विषय असू नये अस ते म्हणाले आपली ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि व्यक्तिमत्व मिळाले आहे मोबाईल सारख्या साधनांचा गुलाम होऊन ते गमावू नका अस समजावताना पंतप्रधान म्हणाले की, आप अपने से भी ज्यादा गॅजेट को जादा स्मार्ट मान देते है, और गलती वही है सुरू हो जाती है आप विश्वास करे की परमात्मा ने आपको बहुत शक्ती दि है आप स्मार्ट है आपसे स्मार्ट कोई नही हो सकता है,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *