पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या मोहन मल्हारी ठोंबरे यांना दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले मोहन मल्हारी ठोंबरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारीत प्रतिबंधात्मक कारवाई करू नये म्हणून तक्रारदाराकडे दहा हजार रुपयाची लाच मागितली यावर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली आज यावर या विभागाने सापळा रचला यामध्ये मोहन ठोंबरे यांनी दहा हजार रुपये स्वीकारत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले, वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *