पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अध्यात्मक गुरु श्री श्री रविशंकर 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते आर्ट ऑफ लिविंग च्या महत्त्वाच्या जलसंधारण प्रकल्पाला भेटी देणार आहेत.तर प्रत्येक ठिकाणी महासत्संगाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूर येथून होणार असून त्यानंतर ते नांदेड, वाटुर, तुळजापूर आणि पुणे असा त्यांचा कार्यक्रम असेल प्रत्येक ठिकाणी ते महासत्संगात भक्तांना मार्गदर्शन करणार असून नांदेडमध्ये ते गुरुद्वारा श्री हुजूर साहेब येथे भेट देणार आहेत. 2 फेब्रुवारी रोजी वाटुर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जलतारा प्रकल्पाच्या जागेला भेट देतील आर्ट ऑफ लिविंग च्या सहकार्याने व्यक्ती विकास केंद्र मार्फत हा प्रकल्प चालवला जातो गावामध्ये विहीर फेरभरण निर्माण करून भूजल पातळी वाढविणे ही या प्रकल्पाची संकल्पना आहे सण 2021 पासून आज पर्यंत वीस हजार पेक्षाही जास्त फेरभरण विहिरी तयार करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील कार्यक्रमांमध्ये पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांचे संवाद साधणार आहेत या मेळाव्याला राज्यभरातून जवळपास एक लाख विद्यार्थी उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर पुण्यातील महा सत्संगात एक लाखाहून अधिक नागरी गणेश अथर्वशीर्ष सादर करणार आहेत तसेच कोल्हापूरमध्ये महा सत्संग बरोबरच श्री श्री रविशंकर ग्रामपंचायत प्रतिनिधींना शासनावर मार्गदर्शन करतील.
