पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] प्रजासत्ताक दिनानिमित्ताने औचित्य साधून झुंज प्रतिष्ठान या ऐतिहासिक वास्तु तसेच वस्तू व कला यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आसलेल्या संस्थेकडून फर्ग्युसन महाविद्यालयातील फिरोदिया हॉल येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश झुंज ने घेतलेल्या अनोख्या स्पर्धेचे ‘संदर्भ कथन स्पर्धेचे’ निकाल जाहीर करणे व इतिहासकार श्री कौस्तुभ कस्तुरे यांचे ‘इतिहास समजून घेताना’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले, संदर्भ कथन स्पर्धेच्या अंतर्गत स्पर्धकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक’ व बाजीराव पेशव्यांनी 1728 ची पालखेड मोहीम या विषयावर समकालीन पुरावे देण्यात आले होते व त्याचा वापर करून स्पर्धकांनी ललित लेख लिहायचा होता. या स्पर्धेला जवळपास, 35 स्पर्धकांनी सहभाग घेेतला त्या पैकी 8 लेेख तापसण्याजोग्या वाटल्या व त्यातून तीन निकाल काढण्यात आले. यात श्री सुनील खोत यांना पतृतीय पारितोषिक, डॉ.सदानंद चावरे यांना द्वितीय पारितोषिक व श्री मंगेश बोराटे यांना प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. या प्रसंगी, श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी ‘इतिहास समजून घेताना’ या विषयावर बोलताना इतिहासातल्या विविध पैलूंवर भर देत, साहित्यिक आणि असाहित्यिक लिखाण नेमके काय असते, इतिहास वाचताना कोणती काळजी घ्यावी, इतिहास अभ्यासताना काय करावे अश्या विविध पैलूंवर व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानानंतर, सुमारे 30 मिनिटांचा प्रश्नोत्तरांचा एक तास झाला, ज्यात श्रोत्यांनी तिन्ही मान्यवरांना, इतिहासावर, इतिहासाच्या होत चाललेल्या विकृतीकरणावर सखोल प्रश्न विचारले व तिन्ही मान्यवरांनी त्याची उत्तरे दिली.
स्पर्धेच्या तिन्ही विजेत्यांचे लेख झुंज च्या वार्षिक मासिकात छापले जाणार असून, इतर काही लेख झुंज च्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होतील.
या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाकडे पाहता, येत्या काळात अश्या अनेक स्पर्धा व उपक्रम आयोजित केले जातील असे झुंज अध्यक्ष मल्हार पांडे, उपाध्यक्ष ऋतुराज काळे व संपर्क प्रमुख विक्रम टिळेकर यांनी सांगितले.
