नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या हस्ते झाले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते ही लस भारत बायोटेक या कंपनीत विकसित झाली आहे प्राथमिक स्तरावरच्या दोन मात्रा म्हणून तसंच हेड्रोलॉग स्पर्धक मात्रा म्हणजे आधी घेतलेल्या कुठल्याही प्रकारच्या लसीनंतर घेता येणारी वर्धक मात्र म्हणून वापर करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे असं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले आहे, जगातली पहिली लस भारताने विकसित करणं हे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरव वाटणारे आहे अशा शब्दात डॉक्टर मनसुख मानवी यांनी भारत बायोटेक आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधकांचा अभिनंदन केले आहे.
