पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सीएनजी गाड्या वापरणाऱ्यांना आज मोठ्या अडचणी निर्माणहोऊ शकतील कारण आज २७ जानेवारी रोजी पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत यामुळेच सीएनजी वाहनांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे हा संप अनिश्चित काळासाठी सुरू राहणार असल्याने संपामुळे सीएनजी वाहन चालकांना सीएनजी उपलब्ध होणार नाही. टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

         पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशनने देखील याआधी बंद पुकारला होता. मात्र मध्यस्थी नंतर संप मागे घेण्यात आला. त्यानंतर टोरंट कंपनीकडून शब्द पाळला गेला नसल्याने पंप चालकांनी संप पुन्हा संप पुकारला आहे. या संपामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात वाहनांना सीएनजी उपलब्ध होणार नाही.

पुणे शहरात महानगर नॅचरल गॅस लिमिटेड च्या सेवा पुणे शहरात सुरू राहतील. परंतु टोरेंट कंपनीच्या डीलर्सनी सीएनजीची खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 1 नोव्हेंबर 2021 रोजी सीएनजी विक्रीतून नफ्याच्या वितरणाबाबत सुधारित यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सुध्दा टोरंट कंपनीने एक रुपयाची देखील वाढ केली नाही. त्यामुळे पंपचालक आणि डीलर्सना संपावर जावे लागत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांनी बेमुदत संप पुकारल्याचे सांगण्यात आले याचा थेट परिणाम सामान्य वाहतुकीवर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र पुणे ग्रामीणमधील सर्व पंप सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *