पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना झालेल्या मारहाण प्रकरणात एक नवीन चित्रीकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे या चित्रीकरणात सरपंच व त्यांचे कार्यकर्ते सुजित काळभोर यांना मारहाण करताना दिसत आहेत त्यामुळे यात नेमके काय घडले याची निःपक्षपाती पणाने तपास करून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील मोठया लोकवस्तीची ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला त्यात महिला सरपंच यांनी आपणास मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला त्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व दोषींवर कारवाई ची मागणी केली होती.
सुजित काळभोर यांनी सांगितले की, आपण मारहाण केलीच नाही तर सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपणास मारहाण केली याची खातरजमा करण्यासाठी तेथील सी सी टी व्ही चित्रीकरण तपासून घेण्याची मागणी केली
