कोलकात्ता (हवेलीनामा वृत्तसमुह) भारताला महान राष्ट्र बनविण्याचे ध्येय राष्ट्रीय स्वयं सत्संग आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे आहे असे संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सोमवारी कोलकत्ता येथे स्पष्ट केले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नेताजी यांचे विचारधारा एकच नसल्याची टीका करण्यात येते या टीकेला मोहन भागवत यांनी उत्तर दिले सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजी लोहा प्रणाम या कार्यक्रमास ते शहीद मिनार मैदानावर बोलत होते
स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे योगदान मोठे होते देशाला विश्व गुरु बनविण्याचे ध्येय बोस यांच्याबरोबरच संघाचे देखील आहे त्यांचे विचार आजही उपयुक्त आहेत परिस्थिती आणि मार्ग वेगळे असले तरी दोघांचे लक्ष सारखेच होते नेताजी धर्मनिरपेक्ष होते आणि संघाची विचारसरणी हिंदूवादी आहे या टीकेचा समाचार त्यांनी घेतला ते म्हणाले नेताजी प्रारंभी काँग्रेस सोबत होते पण स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह आणि आंदोलनाने काही होणार नाही अशी भावना त्यांची झाली त्यांनी मार्ग बदलून क्रांतीचा मार्ग स्वीकारला यांचा मार्ग वेगळा असला तरी ध्येय स्वातंत्र्यप्राप्ती हेच होते नेताजींचे हे विचार आमच्या समोर आहे त्यांच्या ध्येयाचा विचार आम्ही स्वीकारला आहे भारतात जग वसले असून तो जगाला मदत करू शकतो अशी भावना संघाची आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
