नवी मुंबई  (हवेलीनामा आॕनलाईन) भारती विद्यापीठाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्माण केले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारती विद्यापीठ आणि मेडी कव्हरच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले, दोन-तीन दशकापासून आरोग्य क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहे हेल्थकेअर क्षेत्र हे टुरिझमच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले या कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ व मेडिकव्हर रुग्णालय यांच्यातर्फे नवी मुंबई येथे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, गोपाल पाटील, निरंजन डावखरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाहक डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ विवेक सावजी, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, डॉ विलास कदम, स्वप्नाली कदम, अस्मिता जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, भारती विद्यापीठ आणि मेडिकल ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काम करत आहे तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशभरात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मेडिकव्हर ही संस्था आहे युरोपियन समूहाची भागीदार झाल्यामुळे युरोप खंडातील वैद्यकीय व्यावसायिक भारतात यायला मदत होईल महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *