पुणे  (हवेलीनामा आॕनलाईन) पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा 291 वा वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शनिवार वाड्याच्या मुख्य दिल्ली दरवाजा उघडण्यात आला होता रांगोळी सनई चौघड्याचे सूर व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तसेच नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करण्यात आले

या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले इतिहासतज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, विद्याधर नारगोलकर, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, उमेश देशमुख आणि पेशवे कुटुंबिय उपस्थित होते.

शनिवार वाडा ही वस्तू म्हणजे केवळ दगड धोंडे नाहीत तर 250 वर्षाचा मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास सांगणारा ज्वलंत शाहीर आहे. कितीतरी विजयाच्या वार्ता या शनिवार वाड्यावर आल्या, बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानी करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात वैभव संपन्न व देखना शनिवार वाडा बांधला गेला त्यावेळी केवळ पुण्यात आणि भारतातच नाही तर आशिया खंडात उत्तम दर्जाचा हा वाडा प्रसिद्ध होता परंतु या वाड्याचा उपभोग घेण्यासाठी बाजीराव पेशवे येथे थांबले नाहीत त्यांना सतत रणांगणावर लढावे लागले ही देखील अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना भूषण गोखले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *