पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गुण देण्यावरून समाज माध्यमावर गेल्या अनेक दिवसात चर्चा रंगत असून याच मुद्याचा संदर्भ घेऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक पैलवानांना कुस्तीत चीतपट करणारा लढवय्या सिकंदर शेख अखेरच्या सामन्यापर्यंत अनेक मल्लासोबत लढला त्यामुळे कोण कोणापेक्षा भारी हे म्हणून चालणार नाही तसेच समाजात सिकंदर शेख वरून काही जण राजकारण करीत आहेत याला जातीय स्वरूप दिले जात आहे परंतु प्रत्येक मल्लाचा एकच धर्म असतो तो केवळ कुस्तीचा आखाडा, त्यामुळे त्यांना या जातीपातीच्या लेबल खाली बघितलं जाऊ नये, तसेच खेळाला बदनाम करू नका अशी विनंती ही अजित पवार यांनी यावेळी केली. अजित पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी अजित कटके तसेच महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा बुलेट व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कुस्ती या खेळाने देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत देशाचे आणि राज्याचे नाव हिंदकेसरी अजित कटके तसेच महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी ऑलम्पिकमध्ये झळकवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही तर कुस्तीमध्ये कधीच राजकारण आणणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आखाड्यात जे उतरलेच नाहीत ज्यांनी लंगोटही बांधला नाही असेच त्या ठिकाणी आघाडीवर होते हे खरं वास्तव असल्याचे सांगत टीकाकारांना खडे बोल सुनावले ते खेळतात त्यांनीच अधिकार वाणीने बोलण्याची गरज आहे आमच्यासारख्यांनी तिथं तोंडाची वाफ वाया घालवण्याची गरज नाही या प्रकरणी समाज माध्यमावर नुकती चर्चेची गुराळ सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *