पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कोरोनामुळे खरेदी विक्री व्यवहारात आलेली मरगळ दूर झाल्याने सध्या मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार वाढल्याचे महसूल आतून दिसून येत आहे हे आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे यात उद्दिष्ट पेक्षा जास्त महसूल निश्चित मिळेल अशी स्पष्टोक्ती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रवण हर्डीकर यांनी सांगितले
राज्यात सध्या मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार जोरदार सुरू असून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चालू आर्थिक वर्षात डिसेंबर अखेर 18 लक्ष 75 हजार 985 दस्त नोंद होऊन यातून 29 हजार 379 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे यंदा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला 32 हजार कोटीचे उद्दिष्ट दिले असून आतापर्यंत 90% च्या वर हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, तसेच वस्तू व सेवा करा नंतर सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे पाहिले जाते. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे व्यवहार, बक्षीस पत्र, भाडेकरार अशा विविध नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला महसूल मिळाला आहे. शासनाकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले जातात रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो प्रकल्प अशी विविध विकासकामे सुरू करताना शासनालाही मोठ्या महसुलाची आवश्यकता भासते शासनाकडे जमा होणार हा महसूल विविध विकास कामावर खर्च केला जातो.
