पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) 26 जानेवारी रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिन कर्तव्य राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रसह 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह मंत्रालय आणि विभागांचे असे 23 चित्ररथ सहभागी होणार आहेत यावेळी स्त्रीशक्ती संकल्पना आहे देशाची समृद्ध संस्कृती, आर्थिक, सामाजिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगती त्याची झलक या चित्ररथंद्वारे घडणार आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वतीने काल पत्रकार परिषदेत देण्यात आली. संचलनात नौदल हवाई दल आणि सैन्यदलांच्या पथकांचे नेतृत्व महिला अधिकारी करणार आहेत असेही यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्राचा चित्ररथात साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित असून या चित्ररथावर कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण आणि वणीची सप्तशृंगी अशा साडेतीन शक्तीपीठांचा देखावा साकारला जाणार आहे महाराष्ट्रातील लोकल कलांचे दर्शन देखील चित्ररथाच्या माध्यमातून घडणार आहे दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रानं द्वितीय पारितोषिक पटकावले आहे या स्पर्धेत 15 राज्यांचे समूह सहभागी झाले होते त्यात महाराष्ट्राने धनगर नृत्य या लोककलेचे उत्तम सादरीकरण करत पारितोषिक पटकावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *