पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतराव लागलं तरी चालेल, पण देश आणि धर्म याबाबत तडजोड केली जाणार नाही.यासाठी आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. शिवाजी महाराजांना आपण आपल आराध्य दैवत मानतो. सध्या धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल राजकारण सुरु आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. आपण हे सहन करत राहिलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लोकं म्हणतात औरंगजेब सीमेचं रक्षण करायला आला होता. पण, हे वक्तव्य हास्यास्पद आहे. तो तिथं हिल स्टेशनला आला होता का? असा सवाल भाजपचे आमदार शिवेंद्रराजें भोसले यांनी उपस्थित केला.

आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

आम्ही जो इतिहास वाचला,त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच केली गेली आहे, म्हणून यावरत चर्चा होऊ नये, असं सांगून त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं होतं, याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिले.

केंद्रात मोदींचे अर्थात आपलच सरकार आहे.आणि राज्यात देखील आपल सरकार आहे, त्यामुळे या मोर्चाच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील महत्त्वपूर्ण भाग होताच. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. परंतु, आमच्या धर्माचं रक्षण आम्ही करत आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *