थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर परिसरात रोहित्र चोरीचे सत्र पुन्हा चालू झाले असून गेल्या दोन दिवसांत मुळा मुठा नदीवरील दोन रोहित्रातील तांब्याच्या तारा व ऑईल असा 74 हजाराची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे लोणी-काळभोर पोलीसात महावितरण कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

थेऊर परिसरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीतून आजुबाजुचे शेतकरी शेतीसाठी लिफ्टच्या माध्यमातून पाणी उपसतात यासाठी 10 ते 30 एच पीचे विद्युत पंप वापरतात याला विज पुरवठा करण्यासाठी तेथे बरेच रोहित्र आहेत या विज वाहिन्या कृषी फिडरवर असल्याने याला चौदा तास भारनियमन असते विज पुरवठा बंद असल्यानंतर रात्रीच्या वेळी चोऱ्या घडतात अशाच दोन रोहित्र चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गट क्रमांक 63 मधील 100 के व्ही क्षमता असलेले तर त्रिपुरा सुंदरी फार्म गट क्रमांक 68, 69 मधील रोहित्र लागोपाठ चोरीस गेले. याची अंदाजे किंमत 74 हजार रुपये इतकी आहे.
थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव पुढील तपास करीत आहेत.
