पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे शिक्षकावर शेरोशायरी केली म्हणून अकरावीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आळेफाटा येथील ज्ञानेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच फिरत आहे. विद्यार्थ्याने शिक्षकांवर शेरोशायरी केली गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ज्युनिअर कॉलेजमधील मुलांच्या घोळक्यातील एका मुलाने शिक्षकांना पाहून शेरोशायरी केली. मात्र, याबाबत कोणतीही खातरजमा न करता शाळेतील शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण केली. “सर माझी चूक नाही”, अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथाने मारहाण करत राहिले. यातील काही विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केली. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शिक्षकाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *