पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)  बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाचे पूर्व हवेलीत विजांच्या गडगडासह दमदार आगमन झाले त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी पाच नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली तर सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली या मोसमातील हा मोठा पाउस याचा सर्वानीच आनद घेतला.

            पावसाळा सुरू झाल्यापासून मोठया पावसाने तशी पूर्व भागातील गावांना हुलकावणी दिली होती त्यामुळे केवळ एक महिना पावसाळा शिल्लक असल्याने यावेळी सरासरी पूर्ण होईल की नाही याची काळजी लागली होती. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस पडला पण पुन्हा खंडित पाऊस पडला राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तरीही पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला नाही
            सप्टेंबर महिना सुरु झाला ऑगस्ट पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे यावेळी पाऊस ओढ देणार असे वाटत आहे परंतु मोसमाच्या दुसऱ्या पर्वात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी संध्याकाळी थेऊर, कोलवडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, वाडे बोल्हाई, केसनंद आदी गावांना जोरदार पाऊस झाला.या पावसाचा फायदा पाणी पातळीवाढण्यास मदत होणार आहे.
             श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस राज्यातील बहुतेक भागात बैलपोळा हा बळीराजाचा सण. यानंतर ग्रामीण भागातील समजुतीनुसार पावसाची दिशा बदलते.विशेषतः पश्चिमेकडील पाउस कमी होतो आणि पूर्वेकडील पावसाला सुरुवात होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *