पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) श्रावणातील शेवटच्या दिवशी सोमवार आल्याने श्रीक्षेत्र थेऊर येथील महादेव मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती गावातील प्राचीन महादेव मंदिरांपैकी खडकेश्वर,सिद्धेश्वर व पंचालींग मंदिरात महापुजा तसेच रुद्राभिषेक करण्यात आले.

थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे श्री चिंतामणी च्या दर्शनासाठी राज्यातील भाविक येत असतात परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे मंदिर बंद आहे येथील मुख्य चौकातील पंचालींग मंदिरात पहाटे पासून ग्रामस्थांनी जलाभिषेक, दुग्धअभिषेक करून महादेवाची आराधना केली.थेऊर गावच्या पूर्वेला असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात गेली महिनाभर देवाची आराधना मंदिर परिसरात स्वच्छता वेगवेगळ्या झाडांची लागवड करण्यात आली यात आण्णा शेडगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष लक्ष दिले.
तसेच पूर्व हवेलीत सर्वच गावात महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. यात लोणी काळभोर,सोरतापवाडी, उरुळी कांचन आदी ठिकाणी महारुद्राचे दर्शन घेतले.

