पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) ऊसतोड मजुरांच्या कमतरतेसह साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुण्याजवळील मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेच्या 46 वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारा साखर उद्योग टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले नेहमीच शासनाने सहकार्य केलेला आहे आणि भविष्यातही येणाऱ्या ज्या काही अडचणीत आहे त्या देखील दूर करण्याचं काम नक्कीच शासन या ठिकाणी करेल कारण हा उद्योग वाढला पाहिजे टिकला पाहिजे आणि जो लाखो शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहे राज्यांमध्ये गेल्या वर्षी 137.20 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन आणि 12.6 लाख साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झालेला खर म्हणजे साखरेचा वापर आणि त्यानंतर इथेनॉलचा वापर हे देखील आपल्या साखर कारखान्यासाठी महत्त्वाचं होतं आणि मग देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधनामध्ये 10% इथेनॉलचा समावेश करण्याची परवानगी दिली त्यात आणखी वाढ होईल आणि शंभर टक्के इथेनॉल चा वापर करणारी वाहन देखील निर्माण होतील, यामुळे आपल्या साखर कारखान्याला एक प्रकारची नवसंजीवनी मिळणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, साखर कारखान्यांनी भविष्यात योग्य आर्थिक व्यवस्थापना सोबतच पर्यावरण संवर्धन आणि प्रति एकर अधिक ऊस उत्पादनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितलं वसंतदादा साखर संस्था आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाचे सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला साखर उद्योगातील मान्यवर आणि कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
