पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) दाओस स्वित्झर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानुसार सुमारे 25000 कोटी रुपयांचे उद्योग पुणे परिसरात येणार आहेत त्यात औषध, मोटार उद्योग, डाटा तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. राज्याच्या उद्योग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या उद्योग समूहामुळे किमान दहा हजारांहून अधिक रोजगार देखील उपलब्ध होणार आहेत. पुण्याच्या चाकण, रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड परिसरात हे उद्योग सुरू होणार आहेत या उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या एकूण रोजगारांपैकी सुमारे 80% रोजगार स्थानिक लोकांना देण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्यातच अंतिम निर्णय देखील घेतला जाणार आहे. विरोधकांकडून या गुंतवणुकीच्या कराराबद्दल कितीही टीका केली असली तरी राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे करार अतिशय महत्त्वाचे असून त्याचे परिणाम भविष्यात दिसून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला
