पुणे (हवेलीनामा आॕनलाईन ) अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि धीरेंद्र महाराज यांच्यातील वाद चांगलाच रंगला असून शाम मानव यांनी दिलेले आव्हान धीरेंद्र महाराज यांनी स्विकारले आहे.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांना चमत्कार सिद्ध करुन दाखविण्याचे आव्हान दिले होते जर त्यांनी हे सिद्ध करुन दाखवल्यास तीस लाखांचे बक्षीस देऊ असे जाहीर केल्यानंतर धीरेंद्र महाराज यांनी देखील आव्हान स्वीकारून जर आपण चमत्कार दाखवल्यास जन्मभर आश्रमात पाणी भरावे लागेल असे प्रतिआव्हान दिले आहे त्यामुळे यात मोठा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे.

श्याम मानव यांनी नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिलं आहे. धीरेंद्र महाराज रामकथा प्रवचनासाठी नागपूरमध्ये आलेले आहेत. त्यांना रामकथेचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याच्या नावाखाली त्यांना दिव्यशक्तीचे दावे आणि प्रयोग करण्याचा अधिकार नाही, असं श्याम मानव म्हणाले. महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार धीरेंद्र महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असं श्याम मानव यांनी स्पष्ट केलं. याशिवाय धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवल्यास ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं आव्हान देखील श्याम मानव यांनी दिलं.

धीरेंद्र महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध केल्यास त्यांना शरण जाऊन अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम बंद करेन, असं श्याम मानव म्हणाले. श्याम मानव यांनी यामध्ये कुठेही धर्म किंवा देवाचा विरोध नसून देवाच्या नावाखाली लोकांना फसवलं जात आहे. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम लोकांना जागरुक करणं हे असल्याचं श्याम मानव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *