पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कारमध्ये गोमांस भरून वाहतूक करणाऱ्या दोघांना नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांच्या किमतीचे ६५० किलोचे गोमांस व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची टोयोटा कंपनीची कार असा ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला.

नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार,गाडीचालक शहबाज मुक्तार कुरेशी (वय २७) आणि कादिर मुस्तफा कुरेशी (वय ३४, दोन्ही रा. पणसुबा पेठ, जुन्नर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याबाबतची तक्रार कृष्णा प्रताप माने (वय २६, रा, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिली आहे.

आज पहाटे ५.४५ वाजता नारायणगावचे हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावरील मुक्ताई ढाब्याजवळ इंडियन पेट्रोल पंपाशेजारी असलेले पंक्चर दुकानासमोर टोयाटो कंपनीची कार (एमएच ०३ बीसी ०६३९) ही गोमांस वाहतूक करताना आढळून आली. गोमांस वाहतूक करण्यास बंदी असताना व कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या या वाहनात गोमांस नेण्यात येत होते. पोलिसांनी हे वाहन व त्यातील माल ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार आर. एल. काठे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *