पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) तीन वर्षांनंतर सुरू झालेला दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आता पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करीत आहे. यंदाच्या हंगामात महिनाभरात कारखान्याने आजअखेर 1 लाख 790 टन उसाचे गाळप केले आहे.
दौंडचे आमदार आणि भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी ही माहिती दिली. गळीत हंगामाबरोबरच सहवीजनिर्मिती प्रकल्पाल पण चांगल्याप्रकारे उभारी घेत आहे.
भिमा पाटस हा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने सभासद, कामगार, ऊसउत्पादक शेतकरी यांच्यात मोठ्या समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याने गेल्या एका महिन्यात 1 लाख टन उसाचे गाळप केले आणि 86 हजार 950 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. साखर उतारादेखील चांगला मिळत आहे.
मागील आठवड्यातील 1 ते 7 जानेवारी दरम्यानची ऊसउत्पादक शेतकरी वर्गाचे पेमेंटदेखील शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतकरीवर्गाला बाजारभाव सुध्दा चांगला देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन अध्यक्ष कुल यांनी केले आहे.
