पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी परिसरातून अतिशय भयंकर प्रकार पुढे आला असून अंधश्रद्धेतून सासरच्या कुटुंबीयांनी आपल्या सुनेसोबत अघोरी कृत्य केल्याची घटना उघड झाली आहे.
सासरच्या त्रासाला कंटाळून शेवटी सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही भयंकर घटनेचा उलगडा झाला. घरातील लोक अघोरी पुजा करत असतात, ते आपणास स्मशानात घेऊन जातात, तिथूनत प्रेतांची राख आणि हाडांची भुकटी घरी आणून ती पाण्यात मिसळून आपल्याला पाजतात, असा धक्कादायक दावा तक्रारीत केला आहे.घराला बरकत नाही, मूल होत नाही आदी कारणांवरुन आमावस्येला काळे कपडे घालून पीडितेची पूजा केली जात असे. तू लग्न करुन घरात आल्यापासून घरातील लक्ष्मी निघून गेली. असे सांगत सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक त्रास देत. प्रत्येक आमावस्याला प्रेतांची राख आणि हाडांची भूकटी पाण्यातून देणे सातत्याने सुरुच होते असे सांगतानाच गेली चार वर्षे हा अघोरी प्रकार चालू असल्याची माहिती तक्रारीत दिली आहे. सासरचा त्रास न झाल्यामुळेच पीडितेने माहेरच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
सिंहगड पोलिसांनी नरबळी आणि अमानूष अघोरी प्रथा, जादूटोणा कायद्यानुसार सासरच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केली आहे. जयेश पोकळे, श्रेयश पोकळे (दीर), इशा पोकळे (जाऊ), कृष्णा पोकळे (सासरे), प्रभावती पोकळे (सासू) आणि दीपक जाधव, बबीता जाधव यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
