पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) दोन शाळकरी मुलींवर प्राणघातक हल्ला झाल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हदराला असून भरदुपारी झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली असून या हल्ल्यात एक मुलगी ठार तर एक गंभीर जखमी झाली राजापूर तालुक्यातील भालावली येथे दाेन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली गंभीर जखमी असलेल्या मुलीला पुढील उपचारासाठी जिल्हा रग्णालयात हलवण्यात आले आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भालावली येथील या दाेन मुली तेथूनच जवळ असणाऱ्या महाविद्यालयातून घरी जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखाेराने तीक्ष्ण हत्याराने दाेघींवर हल्ला केल्याने यात त्या गंभीर जखमी झाल्या या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी धाव घेऊन दाेघींना धारतळे येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात तातडीने दाखल केले. यावेळी रुग्णालयाजवळ ग्रामस्थांनी एकच गर्दी केली हाेती.दरम्यान, या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या एका मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीला पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती नाटे पाेलिसांना मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. काैटुंबिक जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पाेलिस पुढील तपास करीत आहे
