पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) राजकारणात मोठे यश मिळवल्यानंतर लोकशाहीच्या एका स्तंभातून दुसऱ्या स्तंभाकडे पुणे जिल्ह्यातील एका महिलेने वाटचाल केली अर्थात राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाणाचा पराक्रम ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांचा आहे. सरपंच म्हणून कार्यरत असलेल्या मोहिनी आता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे. सरपंच महिला न्यायाधीश होण्याची ही राज्यातील पहिलीच घटनाआहे.

रहिवासी असलेल्या ॲड. मोहिनी बापूराव भागवत या दौंड तालुक्यातील मळद गावच्या सरपंच आहेत. त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे.मोहिनी यांचा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह ॲड. बापूराव भागवत यांचीशी झाला. बापूराव यांनीही मोहिनी यांना नेहमी प्रोत्साहित केले. त्यामुळेच एमपीएससीचा अभ्यास त्यांनी चालू केला. आणि या परीक्षेत यश मिळवले. ॲड बापूराव भागवत हे दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. मोहिनी यांच्या यशस्वी वाटचालीचे सर्वच स्तरातून कौतुक होत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *