बारामती (हवेलीनामा ऑनलाईन) शेतकऱ्यांमध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात होणार असून कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हजेरी लावणार आहेत. हे प्रदर्शन 19 ते 22 शेतकऱ्यांसाठी कृषी खुले असणार आहे.

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक 2023 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन 19 ते 22 जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे. कृषिक प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत.

यासाठी 170 एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून लाखो शेतकरी भेट देण्यासाठी येतात. त्यासाठी 170 एकरांवरील पीक प्रात्यक्षिक पाहताना शेतकरी गर्दी, त्याचबरोबर वाहनतळ व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांची भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनामध्ये प्रत्येक प्लॉटवर त्या पिकाचे माहिती फलक, तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध उपक्रम पाहता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *