पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महिला बाल विकास मंञालयाकडून युती शासनाच्या काळात अंगणवाडी सेविकाना देण्यात आलेल्या मोबाईलची दैनिय अवस्था झाली असून अनेक वेळा मागणी करुन देखील नवीन मोबाल मिळत नसल्याने शेवटी मोबाईचीच अंतयात्रा काढत आपल्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम भंडाऱ्यात अंगणवाडी सेविकेनी केले यामुळे शहारात या आंदोलनाची भलतीच चर्चा रंगली.
भाजप – शिवसेना युती सरकारच्या काळात महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय कामासाठी मोबाईल देण्यात आले होते देण्यात आलेले मोबाईल जुने झाल्यामुळे वापरताना अनेक अडचणी येतात तसेच मोबाईल मध्ये काही बिघाड झाल्यास तो दुरुस्त होत नाही त्याचे कुठलाच पार्ट मिळत नाही त्यामुळे हा मोबाईल कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे शासकीय डाटा भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा याबाबत तक्रार करूनही शासनाने यावर विचार केला नसल्याने होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि नवीन टॅब मिळावे, यासाठी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून मोबाईलची शवयात्रा काढली.
