पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) भारतीय एकात्मिक शेती संस्थेच्या सहयोगाने राष्ट्रीय पातळीवर एकात्मिक शेती पद्धतीच्या कार्यशाळेला राहुरीतल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कालपासून प्रारंभ झाला या कार्यशाळेसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस भास्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ही कार्यशाळा 21 तारखेपर्यंत चालणार आहे.रासायनिक औषधांमुळे पाणी, जमीन आणि हवा या नैसर्गिक साधनांचा ऱ्हास होत आहे त्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अन्नसुरक्षितता आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त ठरेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केलं राहुरी विद्यापीठाने विकसित केलेलं आयओटी सेंटर तयार केलेले एकात्मिक शेती पद्धतीच्या मॉडेलमध्ये वापरलं तर अल्पभूधारक तसेच मध्यम शेतकरी सुद्धा शाश्वत उत्पन्न मिळवू शकेल या मॉडेल्स मधून आपल्याला केवळ कर्बोधक आणि ऊर्जा मिळणार नसून पोषण सुरक्षितता देखील मिळेल असं डॉ. भास्कर यांनी सांगितले रसायन विरहित शेती आणि पर्यावरणाची सुरक्षितता एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल आत्मसात केलं तरच होऊ शकेल भारतातल्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी जवळजवळ 500 शेतकरी उत्पादक कंपन्या नैसर्गिक शेती हा मुख्य घटक स्वीकारून काम करत आहेत हे चित्र खूप आशादायक असल्याचे सध्यांनी सांगितलं त्यांनी भारतातल्या एकात्मिक शेती पद्धतीच्या विविध केंद्रांच्या संशोधनाचा आढावा सादर केला या कार्यशाळेमध्ये विविध पीक पद्धती सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती या विषयावर बुद्धिमंथन करण्यात येणार आहे या द्विवार्षिक कार्यशाळेसाठी भारतातली 25 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून 160 शास्त्रज्ञ उपस्थित आहेत
