केसनंद (हवेलीनामा आॕनलाईन) केसनंद मधील शेतकऱ्यांनी एक वर्षापासून प्रलंबित असलेला केसनंद वाडेगाव(लाडबावस्ती) रस्ता ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी यांनी मिळून समंजस पणाने मार्गी लावला निवडणूकीच्या जाहिरनाम्यात दिलेली जवळपास अनेक कामे मार्गी लावली असून अनेक कांमाचे भुमीपूजन केले आहे त्यामुळे निवडणूकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामपंचायत पदाधिकार्यानी केला आहे त्या दृष्टीने गावातील जवळपास सर्वच रस्ते गटार लाईन,हायमास्ट दिवे,गावातील जवळपास सर्वच रस्त्यावरील पथ दिवे तसेच नवीन अष्टविनायक महामार्गावर केसनंद हद्दीत महामार्गाच्या कडेने सर्वत्र लाईटचे खंबा उभे करुन सर्व रस्ते उजेडाने चकचकीत केले.गावातील मंदीरे, शाळा,यांची रंगरंगोटीची कामे अशी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत केसनंद गावाला हवेली तालुक्यात विकास कांमाबाबत एक नंबर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली असून नागरीकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्याना प्राधान्य दिले आहे भाविष्यातील वाढती लोकसंख्यानुसार गावचा विकास करण्यावर सरपंच तसेच सदस्य यांनी भर दिला आहे केसनंद -वाडेगाव (लाडबावस्ती) रस्त्याचे कामाचे आज भुमीपूजन करण्यात आले यावेळी केसनंद गावचे सरपंच दतात्रय हरगुडे, उपसरपंच रेखा बांगर, माजी सरपंच मिलिद हरगुडे ,माजी सरपंच संतोष हरगुडे,माजी सरपंच सचिन हरगुडे, विविध विकास सोसायटी चेअरमन वाल्मिक  हरगुडे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष राजेद्र सावंत, कुबेर पतसंस्थेचे चेअरमन रमेश  हरगुडे,माजी उपसरपंच तानाजी बांगर,सुभाष बांगर, ,श्रीहरी बांगर, गणेश हरगुडे,सचिन हरगुडे माजी दिनेश झाबंरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल काका हरगुडे, माजी उपसरपंच रमेश हरगुडे, ,शिवाजी हरगुडे, बाळासाहेब भगवान हरगुडे, नवनाथ हरगुडे, तसेच गावातील जेष्ठ नागरिक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *