पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा चांगलाच समाचार घेतला.

       कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एक उपाय असल्याने सर्वत्र त्यावर जोर दिला जात आहे लसीकरणाच्या मोठ्या मोहिमा घेतल्या जात आहेत पूर्व हवेलीत मोठया लोकवस्तीची गावे असणाऱ्या लोणी काळभोर कदमवाकवस्ती याही गावात या मोहिमा चालू आहेत परंतु या लसीकरण केंद्रावर आपल्या कार्यकर्त्यांना विशेष सवलत मिळाली पाहिजे यासाठी अनेकवेळा वाद होताना दिसतात असाच वाद एंजल हायस्कूल लसीकरण केंद्रावर झाला त्यावेळी सरपंच गौरी गायकवाड यांनी तो सोडवण्यासाठी पुढे झाल्या असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर हात उचलला मारहाण केली
        या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि शासनावर जोरदार टीका केली. पवार साहेबांनी स्त्रियांना चुलीपासून बाहेर काढले ५० टक्के आरक्षण देऊन राजकारणात प्रवेश दिला परंतु सध्याचे सरकार या महिलांना संरक्षण देऊ शकत नाही अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत आरोपी मोकाट आहेत इथे तर त्यांच्याच कार्यकर्त्याने लोकनियुक्त सरपंच महिलेस अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण केली यावर काहीच कारवाई होत नाही यावर शासनाने अनुसूचित जाती जमातींना ज्याप्रमाणे अट्रोसिटी सारखे संरक्षण आहे त्याप्रमाणे महिलांना कायद्यांचे संरक्षण दिल्याशिवाय हे अत्याचार थांबणार नाहीत असे चित्रा वाघ यांनी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *