पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) नाशिकमध्ये पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पुढे येत आहे.पोलिसांनी वडिलास अटक केली आहे.त्या दोघांमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरातील रामकृष्णनगर येथे घडली.ज्योती रामकिशोर भारती (२३) असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी संशयित रामकिशोर अवधूप्रसाद भारती (४५) यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्णनगर भागात रामकिशोर भारती शिवव्हिला अपार्टमेंटमध्ये राहात होते.काल मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास त् ज्योतीबरोबर त्यांचा जोरदार वाद झाला. रागाच्या भरात रामकिशोर यांनी ज्योतीचे तोंड दाबून तिला ठार मारले. नंतर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृत ज्योतीला त्यांनी घरी आणत तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. अंबड पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार हे घटनास्थळी आले. त्यांना संशय येताच त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर रामकिशोर यांनी तोंड दाबून मारल्याची कबुली दिली. अंबड पोलिसांनी रामकिशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *