परळी-वैद्यनाथ (हवेलीनामा ऑनलाईन) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर आज राज ठाकरे हेलिकॉप्टरने परळीत दाखल झाले व त्यांनी अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली यावर कोर्टाने 500 रुपयाचा दंड आकारून त्यांचे अटक वॉरंट रद्द केले. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं. तसंच त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज ठाकरे यांना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आले होते. त्या अटकेचे पडसाद परळीत उमटले. परळीतील धर्मापुरी रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरें यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अरोपपत्र दाखल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

हे वाॅरंट 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना बीडमधील परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती. त्यानुसार, राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर राहिले. आपल्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती राज यांच्याकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. राज यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज ठाकरे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावून अटक वॉरंट रद्द केला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *